loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिका येथील मायामी युनिर्व्हसिटीमधील विद्यार्थी व प्राध्यापकांनाही आवडला गोठे खलाटी धबधबा

मंडणगड(प्रतिनिधी)- गोठे खलाटी येथील हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यातील काळ्याभोर कातळांमधून धबधब्याच्या कोसळणार्‍या असंख्य जलधारांचे दृश्य पाहताना जणू निसर्गाने हजारो नेत्र उघडून पृथ्वीवर जलाभिषेक सुरू केल्याचा भास होतो. पाण्याची प्रचंड गर्जना, उडणारे शुभ्र तुषार, दरीत घुमणारा नाद आणि धुक्याने वेढलेला परिसर पर्यटकांनाच काय ? तर इथं आलेल्या प्रत्येकालाच अक्षरशः मंत्रमुग्ध करून जातो असे हे मंडणगड तालुक्यातील गोठे खलाटी येथील धबधब्याचे ठिकाण आहे. अनेक नररत्नांच्या पद स्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. इथला सह्याद्रीचा डोंगरभाग, द-याखो-यातील नयनरम्य परिसर, हिरवागार निसर्ग, पावसाळ्यात कोसळणारे अद्भुत धबधबे, विस्तीर्ण समुद्र किनारा, ऐतिहासिक गड किल्ले, कातळशिल्प, लेणी आदींचे पर्यटकांना याचं खूप आकर्षण आहे. अशाच या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका हे रत्नागिरी जिल्हयाचे एक उत्तर टोक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटून गेली तरी या तालुक्यात सोयी सुविधांचा अजूनही अभावच आहे. मात्र, ही कसर निसर्गाने चांगलीच भरून काढली आहे. निसर्ग संपन्न मंडणगड तालुक्यातील कासवांसाठी प्रसिद्ध असलेले वेळास, बाणकोट येथील हिम्मतगड, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, मंडणगड किल्ला, भोळवली देवाचं डोंगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगाव आंबडवे आदीबरोबरच मनाला निखळ आनंद देणारा गोठे खलाटीत साधारणपणे ३५ फुट उंचीवरून वाहणारा गोठे खलाटी नावाचा धबधबा. निसर्गाने भरभरून वरदान दिलेल्या गोठे खलाटी येथील धबधब्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसे फारसे इकडे कोणी टवाळखोर फिरकत नाहीत. हिरव्याकंच गर्द दाट झाडीच्या डोंगर रांगामधून पांढर्‍या शुभ्र पाण्याचा फवारा उडवत फेसाळणारा अखंडीतपणे खाली कोसळत असलेला धबधबा पाहताच खरंच डोळ्याचे पारणे फिटते. माहीतगारांशिवाय तसे येथे जाणे धोक्याचे आहे मात्र दुर दुर वरुन येथे येणार्‍या निसर्ग प्रेमी सज्जनांची संख्या वाढत चालली आहे.

टाइम्स स्पेशल

मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोठे या ठिकाणी अप्लाइड एन्व्हारमेंटल रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे यांचे माध्यमातून अमेरिका येथील मायामी इन्व्हरसिटी मधील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी भेट दिली येथील निसर्ग संसाधने, संस्कृती व जैवविविधता पाहणी केली ग्रामपंचायत चे मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने आलेले प्रतिनिधी यांचे स्वागत व सन्मान केले.या आलेल्या टीमने परिसरातील सावित्री नदी सेल्फी पॉईंट, कांदळवन, गोठे खलाटी धबधब्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली ग्रामस्थ व येथील निसर्ग साधनांचे कौतुक केले टीम प्रतिनिधी डॉ. केविन, संस्थापक डॉ. अर्चना गोडबोले यांनी या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेत समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg