loader
Breaking News
Breaking News
Foto

शास्त्रीपूल डिंगणी फाट्यावर रस्ते अपघातात गाईचा मृत्यू; स्थानिक पदाधिकार्‍यांकडून सन्मानपूर्वक दफनविधी

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- शास्त्रीपूल डिंगणी फाट्यावर झालेल्या एका रस्ते अपघातात गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर मृत गाईची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे मृत गाईचा सन्मानपूर्वक दफनविधी करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम आणि भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे यांनी आपल्या सहकार्‍यांसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेल्या मृत गाईचा अवमान होऊ नये तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी दफनविधीची सर्व व्यवस्था स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केली.

टाइम्स स्पेशल

या दफनविधी प्रसंगी वैभव रहाटे, संजय रहाटे, वरुण नागवेकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी मिळून या मुक्या प्राण्याला अंतिम निरोप देत धार्मिक व सन्मानजनक पद्धतीने दफनविधी पार पाडला. कठीण प्रसंगात मुक्या प्राण्याबद्दल दाखवलेल्या या भूतदयेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून, भाजप गोमाता संरक्षण समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव यांनी या कृतीची विशेष दखल घेत सर्व पदाधिकार्‍यांचे व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg