रत्नागिरी : कळझोंडी - वरवडे रोडची दुरावस्था आणि त्यावरील 6 वर्षांपासून बंद असलेली बस सेवा याबाबतचा विडियो नुकताच विद्यार्थ्यांकडून प्रसिद्द झाला. याची गंभीर दखल ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी एस टी प्रशासनाशी बंद असणाऱ्या बससेवेबाबत चर्चा करुन तातडीने ह्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती घेवून त्यावर मार्ग काढला जाईल असे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले. तसेच धाडस दाखवून सत्य परीस्थीती समोर आणणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण गौरव करणार असल्याचे प्रसाद सावंत यांनी सांगितले. शिक्षण घेण्यासाठी जीव धोक्यात घालून जावं लागतंय अशी परिस्थिती आहे रत्नागिरीतील कळझोंडी आणि वरवडे या मार्गावर. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना दररोज खड्डे, चिखल आणि झाडी झुडपं तोडत शाळेत जावं लागतंय. एवढ्या दयनीय परिस्थितीशी दोन हात करत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागतंय यासारखे दुर्भाग्य नसल्याची खंत प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली.
"मी आता कळझोंडी आणि वरवडे या मार्गावर उभी आहे. पहिलीपासून दहावीपर्यंत आम्ही दररोज इथे ये-जा करतो. पण या रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे. दोन्ही बाजूला झाडी आहे, खड्डे आहेत. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो.", असे आज्ञा विचारे ह्या विद्यार्थीनीने पत्रकारांच्या भूमिकेत राहून विडियो सादर करताना सत्य परिस्थीती समोर आणली. सहा वर्षांपूर्वी इथून एसटी बस जायची. पण एका अपघातानंतर बससेवा बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायीच जावं लागतं. पावसात अंगावर चिखल उडतो, मोठी वाहने वेगाने जातात आणि बाजूला जायला जागाच नसते, असेही एका विद्यार्थ्याने निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे - "हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा". जीव मुठीत धरून शिक्षण घेणाऱ्या या मुलांसाठी प्रशासन कधी जागं होणार, असा सवाल प्रसाद सावंत यांनी उपस्थीत केला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.