नवी दिल्ली, ११ ऑगस्ट : ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या नातीच्या विवाहानिमित्ताने दिल्लीत आयोजित केलेल्या स्वागत समारंभात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका प्रगतशील शेतकर्याची भेट घालून दिली. फणसकिंग म्हणून अल्पावधीतच नावा रुपाला आलेले लांजाचे सुपुत्र मिथिलेश देसाई यांचा पवारांनी पंतप्रधानांशी संवाद घडवून आणला. जवळपास १५-२० मिनिटे झालेल्या या भेटीत मिथिलेश देसाई यांनी फणसापासून बनविण्यात आलेल्या अनेक पदार्थांसह फणसाच्या सालीपासून तयार केलेली एक आकर्षक हँडबॅग मोदींना भेट दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांच्या लग्नाच्या रिस्पेशनचा कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी-राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. ‘फणस किंग ’ म्हणून परिचित झालेले मिथिलेश देसाई हेदेखील या स्वागत समारंभाला उपस्थित होते. भारतासाठी लंडन स्थित सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हबच्या ब्रँड ऍम्बेसेडर पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
त्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील फणसकिंग म्हणून ओळखल्या जाणार्या मिथिलेश देसाई याच्या जॅक फ्रुट ऑफ इंडिया या कंपनीजवळ लंडन स्थित सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब या सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टमला चालना देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी महत्त्वाचा सामंजस्य करार केला होता. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील १००० हून अधिक शेतकर्यांवर याचा प्रभाव पडला आहे. मिथिलेश देसाई याने जगभरातील ८६ वैविध्यपूर्ण फणस वाण जोपासणे, एकत्र करणे यातील विलक्षण कामगिरीमुळे जागतिक मान्यता मिळवली आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने ‘कृषी गौरव पुरस्कार’ प्रदान केला होता. फळबाग लागवड आणि शाश्वत शेती या क्षेत्रातील त्याचे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे अधोरेखित झाले.खा. शरद पवार यांनी मोदी आणि मिथिलेश देसाईंचा परिचय करून दिल्यानंतर मोदींनी मिथिलेश देसाई यांच्याशी गप्पा मारल्या. कोकणातील फणसाला आंबा, काजूच्या तुलनेत फारसे महत्व मिळत नाही. मात्र फणस हादेखील एक कल्पवृक्ष आहे. या धारणेने मिथिलेश देसाई काम करतात. कृषी अभियांत्रिकी (बीटेक) शाखेचे शिक्षण घेतलेल्या मिथिलेश देसाई यांनी मोदींना फणसाबाबत खुप माहिती दिली. पंतप्रधानांनीही त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या.
या भेटीदरम्यान देसाई यांनी फणसापासून बनविलेले पदार्थ आणि वस्तू पंतप्रधानांना भेट दिल्या. त्यामध्ये फणसाचे साठ (फणस पोळी), फणसाचे तळलेले गरे (वेफर्स) , फणसाच्या आठल्यांची तयार केलेली पावडर, त्याचप्रमाणे फणसाच्या सालीपासून तयार केलेली सुंदर हँडबॅग आणि पासपोर्ट होल्डर मोदींना भेट दिला. त्यावेळी चर्चा करताना मिथिलेश देसाई यांनी एखादे वर्ष ‘फणस वर्ष’ म्हणून साजरे व्हावे अशी विनंती पंतप्रधानांना केली. पंतप्रधानांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या भेटीची चर्चा स्वागत समारंभात चांगलीच रंगली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.