loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरीच्या गुन्ह्यात लपून बसलेला संशयित किशनपूरमधून जेरबंद; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाकडून एका गुन्ह्यात दीर्घकाळापासून फरार असलेल्या संशयिताला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला संशयित रामहित निषाद हा महाराष्ट्रात मजुरी करत होता आणि तो बर्‍याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर रत्नागिरी ग्रामीण पोलीस पथकाने उत्तर प्रदेशमधील किशनपूर भागात धडक देत स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला त्याच्या गावातून मोठ्या चलाखीने ताब्यात घेतले. ही धडक कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल गणपत जानू झोरे आणि कॉन्स्टेबल प्रशांत प्रकाश बंडवे यांनी पार पाडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि वरिष्ठ पातळीवरील मार्गदर्शनाखाली हे पोलीस पथक किशनपूर भागातील कुम्हारन डेरा मजरे रायपूर भसरौल गावात पोहोचले. तेथे सापळा रचून या संशयिताला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक त्याला घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले.

टाईम्स स्पेशल

किशनपूर ठाण्याचे प्रभारी मनीष सिंह यांनी देखील या कारवाईला दुजोरा दिला असून महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने वॉन्टेड आरोपीला यशस्वीरित्या ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईसाठी या संशयिताला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg