loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारपूरमध्ये १५ ऑगस्टला विधी साक्षरता शिबिर; जिल्हा न्यायालयातील अधिकारी मार्गदर्शन करणार

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या ऑगस्ट २०२६ मधील समान किमान कार्यक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शृंगारपूर येथे विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत मिळणारी मदत व कायदेशीर हक्क, आदिवासी समुदायांच्या हक्कांबाबतची संवाद योजना-२०२५, पर्यायी वाद निवारण पद्धती व त्यांचे फायदे तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे अध्यक्ष व्ही. वाय. जाधव यांच्यासह जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या शिबिरास शृंगारपूर गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच आशा वर्कर्स यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg