देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नागरिक, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि देवळे गावच्या इतिहास-संस्कृतीची माहिती आपल्या लेखणीतून सर्वांपर्यंत पोहोचविणारे शरद अनंत साडविलकर यांचे दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देवळे गावावर शोककळा पसरली. सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. साडविलकर हे देवळे गावातील जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व होते.
प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणे, आदराने संवाद साधणे आणि गावातील प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध जपणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. लेखनाची विलक्षण आवड असलेल्या साडविलकर यांनी सोशल मीडिया व फेसबुकच्या माध्यमातून अनेक ब्लॉग लिहून देवळे गावातील विविध मंदिरे, प्राचीन वास्तू, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक संदर्भ आणि गावच्या वैभवशाली परंपरेतील अनेक अपरिचित पैलू सर्वांसमोर आणले. त्यांच्या लेखणीतून देवळे गावच्या इतिहासाची आणि संस्कृतीची एक वेगळीच ओळख निर्माण झाली.
देवळे ग्रामविकास मंडळाच्या लेखन कार्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. गावाच्या विकासाबरोबरच गावचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेले कार्य निश्चितच स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने देवळे गावाने एक आपुलकीचा माणूस, अभ्यासू लेखक आणि गावच्या इतिहास-संस्कृतीचा जागर करणारा संवेदनशील व्यक्ती गमावला आहे. त्यांच्या लेखणीची उणीव आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या आठवणी कायमच देवळे ग्रामस्थांच्या मनात राहतील.




















.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.