loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेतर्फे ग्रंथालय दिन उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील लोकमान्य वाचनालय, लांजा या संस्थेच्या वतीने डॉ. एस.आर.रंगनाथ यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन लोकमान्य वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांचे हस्ते डॉ. एस आर.रंगनाथन यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. त्यावेळी वाचनालयाचे सभासद संध्या तेंडुलकर, प्राथमिक शिक्षक बाबासाहेब माने लांजा आरोग्य सेवक विजयसिंग चव्हाण, लवू बंडबे, संपदा पालकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांनी डॉ. एस आर.रंगनाथन यांचे बालपण आणि ग्रंथालयीन चळवळीतील योगदान तसेच ग्रंथालय चळवळ वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या त्यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती थोडक्यात दिली. तसेच वाचनालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेऊन वाचनाचे महत्त्व पटवून दिले. वाचनालयाचे सभासद संध्या तेंडुलकर यांनी वाचनालयात वाचनात आलेल्या वेगवेगळ्या वाचनसाहित्याविषयी अनुभव सांगून वाचनालय राबवित असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

तर या कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर यांनी केले तर या कार्यक्रमास वाचनालयाचे कर्मचारी, वाचक, सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg