loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी पं.स. शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकार्‍यांची पीएमश्री दत्तमंदिर शाळेला भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी पंचायत समिती शिक्षण विभागाचे थोरात यांनी मंगळवारी वैभववाडी शहरातील पीएमश्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी पालक सभाही असल्याने पालक सभेत पालकांनाही मुलांचा अभ्यास कसा घ्यावा? मुलांना काय पाहिजे? याविषयी माहिती देत पालकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळा सुरू झाल्यापासून गटशिक्षण अधिकारी यांची ह्या शाळेला ही तिसरी भेट असल्याने पालकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, शाळा समितीचे नूतन अध्यक्ष तेजस साळुंखे, उपाध्यक्ष कळसुरकर, पालक तथा वैभववाडी शहराच्या नगरसेविका सुनिता चव्हाण, पालक स्वप्निल धुरी, राजा गजोबार, रत्नमोल निकम, जंगम, शिक्षिका शिंदे, शिक्षिका दळवी यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg