loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मला माझ्या आईची कमतरता जाणवतेय’ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मकथा पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पीएम मोदी भावूक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मकथाचे विमोचन केले. याचे शिर्षक ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लीकः माय लाइफ माय स्ट्रगल्स’ आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबेन यांची आठवण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंतप्रधान मोदी म्हणाले ‘तुम्ही रामनाथ कोविंद यांचे जीवन पहा, ते एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. कानपूर गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, उन्हाळ्यातील वातावरणात एकेदिवशी त्यांच्या घराला आग लागली. आई सर्व चिंता सोडून घरातील वस्तू बाजूला करीत होती.’तसेच पीएम मोदी म्हणाले एका सामान्य परिवारामध्ये आईसाठी एक एक वस्तू मुलांच्या पालनपोषणासाठी असते. त्याच प्रयत्नात आगीत अडकल्याने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तुम्ही विचार करु शकता की, इतक्या लहान वयात आई नसणे किती दुःखदायक आहे. मी तर भाग्यशाली आहे. माझी आई १०० वर्षांपेक्षा जास्त जिवंत राहिली आणि मला आशिर्वाद देत राहिली. तरीही मला माझ्या आईची कमतरता जाणवतेय.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg