loader
Breaking News
Breaking News
Foto

राहुल गांधी यांच्या विधानानंतर अमित शहा विद्यार्थी आंदोलनावर चर्चेस तयार, आज दुपारी ३ वाजल्यापासून चर्चेची दिली वेळ

नवी दिल्ली - संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा अमित शहा यांना प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांनी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालविण्याचा आणि लाठीमार करण्याचा आदेश कुणी दिला? याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. त्यांनी गृहमंत्र्यांवर २० दिवसांपासून गायब राहण्याचा आरोप करीत विरोधी पक्षाला त्यांचे लेक्चर ऐकण्याची इच्छा नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा देशातील युवा पिढीचा समावेश होतो. विद्यार्थ्यांवर गोळी कुणी चालविली, खिळा ठोकलेल्या लाठ्या चालविण्याचे आदेश कुणी दिले. काय आमच्या विद्यार्थ्यांवर गोळी चालविण्याचा आदेश अमित शहा देवू शकतात का? जर त्यांनी असे केले असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री यांच्यात हिंमत नाही, ते सदनमध्ये येवू शकत नाही.

टाईम्स स्पेशल

यापूर्वी केंद्रिय गृृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना संसदेत चर्चेसाठी २४ तासांचा वेळ दिला आहे. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत संसदेत उपस्थित रहावे, सर्वप्रथम बेपत्ता, पळून गेलो सारख्या भाषा, सार्वजनीक आणि संसदीय जीवनात आजकाल जास्त ऐकायला मिळत आहेत. जेव्हापासून सत्र सुरु झाले आहे, तेव्हापासून मी नेहमी संसदेत येत आहे. मी माझ्या चेंबरमध्ये बसतो. संसदेच्या दोन्ही सभागृहात काम करु दिले जात नाही, तर कोण काय करेल? आता चर्चाच होणार असेल तर त्यांनी आपली तयारी दर्शवली. दरम्यान संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले की, सराकर नीटविरोध प्रदर्शनावर चर्चा करण्यास तयार आहे. आज दुपारी ३ वाजल्यापासून उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत. मी सदनमध्ये असेन मी सर्वांचे ऐकेन आणि उत्तर देईन.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg