संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - लहान वयापासून मुलांना आवडीचे फास्ट फूड न खाता म्हणजे बाजारात तयार असणारी उत्पादने वारंवार सेवन करून आरोग्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागते. केवळ चटकदार पदार्थ खावून आवश्यक पोषक जीवनसत्वं, क्षार, असे घटक मिळत नाहीत. त्यासाठी या वयातच मुलांना शालेय पोषण आहाराबरोबर, रोजच्या जेवणात विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे असते. कोकणात चार महिने पडणार्या पावसामुळे अवती भोवती व रानात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पण एवढ्या उपयोगी भाज्यांचा पाहिजे त्या प्रमाणात उपयोग होत नसतो.
या करिता अशा पाले भाज्यांचा उपयोग व्हावा व त्यांचे महत्व कळावे व त्यातून मुलांना भाज्या खाण्याची सवय लागून, आवड निर्माण व्हावी, त्यातून पोषक घटक आरोग्याला मिळावेत अशा हेतूने संगमेश्वर तालुक्यातील शाळा धामणी नं.१ या शाळेत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी अवती भोवती सहज उपलब्ध होतात, अशा टाकळा, अळू, कवळा, वडीचे अळू, माठ, फोडशी, भारंगी, आदी पालेभाज्यांची प्रदर्शन स्वरूपात मांडणी करून व कांही पाककृतीने तयार करून सर्व भाज्या़चे उपयोग, चव, करण्याची पद्धत अशी सविस्तर लिहून आणलेली माहिती मुलांनी उपस्थितांना सांगितली.
तसेच उपस्थित पालक व शाळेतील शिक्षक यांनी यावर मुलांना सखोल मार्गदर्शन करून रानभाज्या खा, व दीर्घायुषी व्हा! हा संदेश दिला. याप्रसंगी शा.व्य.अध्यक्षा दिक्षा शिंदे, उपाध्यक्षा प्रेरणा लिंगायत, ग्रा,पं. माजी सदस्या स्वाती सप्रे, शिक्षण प्रेमी अनंत लिंगायत, शिक्षिका कीरण नरवडे, मुख्याध्यापक प्रकाश गेल्ये, इतर सदस्य, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी मुक्ता शिंदे व हेमल लिंगायत यांनी केले.
































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.