सावंतवाडी: तेरेखोल समुद्रात मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेला माजगाव-कुंभारवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. आज बुधवारी सकाळीच त्यांचा मृतदेह मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८, रा. माजगाव कुंभारवाडी, ता. सावंतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश पेडणेकर हे सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र यशवंत उर्फ योगेश विष्णु परब (रा. चराठा) यांच्यासोबत तेरेखोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, ते उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. याप्रकरणी त्यांची पत्नी मिनल महेश पेडणेकर (वय ४०) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सावंतवाडी पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर क्रमांक ४०/२०२६ अन्वये गुन्हा नोंद केला होता. या घटनेचा तपास पोलीस हवालदार पाटील (बकल नं. १००५) करत होते.
दरम्यान, बेपत्ता महेश पेडणेकर यांचा मृतदेह मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी सभापती राजू परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सावंतवाडी पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महेश यांचा मृत्यू समुद्रात बुडून झाला की अन्य काही कारणाने, याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.