loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खेड : येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, खेड या प्रशालेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये इ . ४ थी मध्ये खुशी रुपेश जड्याळ ( जिल्ह्यात ८६ वी ) तसेच इ. ७ वी मध्ये प्रणव राजेश म्हादे (जिल्ह्यात ६७ वा) या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, माजिद खतीब, डॉ. पुष्कर नेणे, विलीन पाटणे, समन्वयक जॉय, एल्सी, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

यशवंत विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहा. शिक्षक, दिलदार कांबळे, निखिल भोसले, मधुरा वैद्य, अरबीना गोलंदाज, साक्षी सैतवडेकर, अबिदा परकार, विशाखा जंगम , कादिरी , पूजा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg