खेड (प्रतिनिधी )- पंचायत समिती खेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “हर घर तिरंगा रॅली” मध्ये खेड मधील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला. देशभक्तीच्या वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्या शमिका म्हादे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, खेडचे गट विकास अधिकारी विजय करपे, गटनेते निकेतन पाटणे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उप नगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, महीला बालकल्याण समिती सभापती रसिका खेडेकर, नगरसेवक यश खेडेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेवक भुषण चिखले, नगरसेवक आरीफ मुल्लाजी तसेच पंचायत समिती खेड सर्व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय हिंद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता. शालेय विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. यावेळी शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीमुळे खेड शहरात देशभक्तीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.












































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.