loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा न्यू इंग्लिश स्कूलच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बांदा (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित ज्युनियर ॲथलेटिक मीट स्पर्धेत मडुरा येथील न्यू इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत चार खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. रविवार, २ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल, आरोस येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा प्रशालेचे नऊ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी चार खेळाडूंनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१६ वर्षांखालील मुलांच्या गटात सहदेव लक्ष्मण पाडलोसकर (दहावी, पाडलोस) याने भालाफेक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. रमेश संजय परब (दहावी, रोणापाल) याने उंच उडीमध्ये अव्वल स्थान पटकावले. देवेश गोपाळ नाईक (नववी, मडुरा) याने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच अंकुश प्रशांत नाईक (आठवी, पाडलोस-केणीवाडा) याने किड्स जॅव्हेलिन तसेच ‘ए’ ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. क्रीडा शिक्षक महेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, कोषाध्यक्ष वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव तथा प्राचार्य नंदकुमार नारायण नाईक, मुख्याध्यापिका सायली परब, समन्वय समिती व शालेय समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक आणि माजी विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg