देवगड : देवगड तालुका रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने रिक्षांच्या माध्यमातून देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ देवगड रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाबू वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या यात्रेदरम्यान रिक्षांच्या माध्यमातून बाळूमामा, नरसिंहवाडी, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर यांसह विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन देवदर्शन करण्यात येणार आहे. रोजच्या धकाधकीच्या व्यवसायातून काही काळ दूर जात मनाला भक्ती आणि अध्यात्माची जोड मिळावी, या उद्देशाने या देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाबू वाडेकर यांनी सांगितले.
या उपक्रमाला ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे यांनी शुभेच्छा देत रिक्षाचालकांच्या या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सहभागी सर्व रिक्षाचालकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या देवदर्शन यात्रेत रवी चांदोस्कर, ज्ञानदेव भडसाळे, रवी गिरकर, दिलीप कावले, राजू कावले, शीतल पाटील, अनंत भाटकर, इरफान खान, हर्षल गावकर, रमेश सादये, हेमंत जोईल, योगेश करंजेकर यांच्यासह अन्य रिक्षाचालक सहभागी झाले आहेत.
व्यवसायाच्या दैनंदिन धावपळीतून काही काळ भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत आत्मिक समाधान मिळावे, तसेच रिक्षाचालकांमध्ये एकोपा आणि आपुलकी वाढावी, या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.












































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.