विलवडे (सागर गोवळे) - विलवडे रेल्वे स्टेशनच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागाचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची भेट घेऊन निवेदन दिले. सुमारे ७२ गावांशी जोडलेल्या विलवडे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेने केलेल्या मागण्यांकडे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड दुर्लक्ष करत असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. संघटनेच्या १० प्रमुख मागण्यांपैकी जनशताब्दी, मांडवी व नेत्रावती एक्सप्रेसला विलवडे स्टेशनवर थांबा मिळणे ही मुख्य मागणी आहे.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या आठवड्यात कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार प्रमोद जठार यांनी दिले. सल्लागार सुभाष लाड यांनी लांजा-राजापूर नागरिक संघातर्फे माचाळ पर्यटनस्थळ, प्रभू सरदेशी वाडा आणि गोविळ येथील समस्यांबाबत निवेदन दिले. यावर आमदारांनी लवकरच प्रत्यक्ष दौरा करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कोकणातील तरुणांनी रोजगार व व्यवसायासाठी शहरांकडे न जाता आपल्या भागातच व्यवसाय, आधुनिक शेती आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन आमदारांनी केले. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या भेटीवेळी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश काटकर, सल्लागार सुभाष लाड, सरचिटणीस राज हांदे, सहचिटणीस विश्वनाथ आयरे, सदस्य प्रसाद जाधव, प्रशांत पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मागण्या पूर्ण होईपर्यंत संघटनेचा पाठपुरावा असाच सुरू राहील, असा निर्धार विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.



1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.