loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यात श्रावण भजन महोत्सव २०२६ उत्साहात साजरा होणार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ, गुहागर तालुका यांच्या वतीने यंदाचा ‘श्रावण भजन महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 23 ऑगस्ट 26 रोजी श्रावण भजन महोत्सव भंडारि भवन गुहागर येथे साजरा होणार आहे. भजन रसिकांनी, भजनी प्रेमींनी, भजन कलाकारांनी जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भजनाची परंपरा टिकवून ठेवणे, भजनाच्या माध्यमातून भक्ती व समाजप्रबोधनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे तसेच भजनी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. मागील वर्षीही गुहागरमध्ये श्रावण भजन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या महोत्सवात भजनी मेळाव्याचे नियोजन, भजन सम्राट बुवा यांचा ७५वा वाढदिवस साजरा करण्यात ऐणार आहे.

टाईम्स स्पेशल

गुहागर तालुक्यातील सर्व भजनी मंडळांनी, बुवा तसेच भजन मंडळांचे प्रतिनिधी यांनि महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे आणि सचिव संदेश हुमणे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg