loader
Breaking News
Breaking News
Foto

सणघर चाटव शाळेचा अर्णव मोरे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ७१ वा

आंबवली - नुकत्याच जाहीर झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आंबवली प्रभागातील जिल्हा परिषद शाळा सणघर चाटव या दुर्गम शाळेतील विद्यार्थी अर्णव अभिजीत मोरे याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 71 वे स्थान पटकावून अभिनंदननीय यश संपादन केले. याच शाळेतील शनाया चंद्रकांत मोरे हिनेदेखील उत्तीर्ण होत शाळेची शान वाढवली. शाळेचा चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने प्रथमच असे उज्वल हे संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक बबन राजाराम साळवी यांचे मार्गदर्शन लाभले. बबन साळवी हे शिक्षक समिती शाखा खेडचे तालुका नेते असून संघटना सांभाळतानाच शाळेतील गुणवत्तेला महत्त्व देऊन शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लावून त्यांनी एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

टाईम्स स्पेशल

शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बाबुराव मोरे तसेच उपाध्यक्ष शुभांगी जगन्नाथ मोरे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. शाळेने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल अठरा गाव धवडे बांदरपट्टीमध्ये या शाळेचे विशेष कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg