loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’तर्फे यावर्षीही ‘मंगलमूर्ती सजावट स्पर्धा’ थाटामाटात संपन्न होणार!

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे यावर्षीही ‘मंगलमूर्ती सजावट स्पर्धा’ जाहीर करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठानच्या सभेत या स्पर्धांची रुपरेषा निश्‍चित करण्यात आली. मंगलमूर्ती सजावट स्पर्धांचे आता ३४ वे वर्ष असून यावर्षीही नेहमी प्रमाणे थाटामाटात ही स्पर्धा संपन्न करण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या बैठकीत करण्यात आला. या ‘मंगलमूर्ती सजावट स्पर्धे’चा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस रोख पारितोषिके, आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. पारितोषिके पुढील प्रमाणे - १) प्रथम पुरस्कार - रु. २१,१११/- रोख २) व्दितीय पुरस्कार - रु. १५,५५५/- रोख ३) तृतीय पुरस्कार - रु. ११,१११/- रोख ४) उत्तेजनार्थ पुरस्कार - रु. ५,५५५/- रोख. १)प्रथम पुरस्कार - रु. १५,५५५/- रोख २) व्दितीय पुरस्कार - रु. ११,१११/- रोख ३) तृतीय पुरस्कार - रु. ७,५५१/- रोख ४) उत्तेजनार्थ पुरस्कार - रु. २,५०१/- रोख. १) प्रथम पुरस्कार - रु. ११,१११/- रोख २) व्दितीय पुरस्कार - रु. ७,७७७/- रोख ३) तृतीय पुरस्कार - रु. ५,५५५/- रोख ४) उत्तेजनार्थ पुरस्कार - रु. २५०१/- रोख. या सर्व स्पर्धांतील पारितोषिक विजेत्या गणेश उत्सवांना मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा जाहीर गौरव करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धा १) रत्नागिरी जिल्हा सार्व. गणेशोत्सव २) रत्नागिरी ता. घरगुती गणेशोत्सव व ३) गणेशोत्सव मिरवणूक अशा ३ विभागात संपन्न होतील. सालाबाद प्रमाणे यावर्षीही स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व गणेशोत्सवांना प्रतिष्ठानची परिक्षक मंडळे प्रत्यक्ष भेट देऊन परिक्षण करतील व नंतर निर्णय घोषित करण्यात येईल. १) प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख - शनि. दि. १२ सप्टें. २०२६, २) स्पर्धेतील गणेशोत्सवांना परिक्षक मंडळाच्या भेटी - दि. १६, १७ व १८ सप्टें. २०२६, ३) स्पर्धेचा निकाल घोषित - शनि. दि. १९ सप्टें. २०२६ रात्रौ, ४) मिरवणूक स्पर्धा निकाल - शुक्र. दि. २५ सप्टें. २०२६ रात्रौ, ५) पारितोषिक वितरण सोहळा - रवि. दि. २७ सप्टें. २०२६ याप्रमाणे या स्पर्धेचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही सन्माननीय अतिथींच्या शुभहस्ते पारितोषिक विजेत्यांचा जाहीर कार्यक्रमात ढोल ताशांच्या गजरात व ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व सन्मानपत्रे देऊन गौरव करण्यात येईल. पारितोषिक वितरण सोहळा रवि. दि. २७ सप्टें. २०२६ रोजी मराठा हॉल, रत्नागिरी येथे संपन्न होईल.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍या जिल्ह्यातील सार्व. गणेशोत्सव मंडळांनी तसेच रत्नागिरी तालुक्यातील घरगुती गणेशोत्सवांनी शनि. दि. १२ सप्टें. २०२६ रोजी रात्रौ १२ वा. पर्यंत नावनोंदणी करावयाची आहे. त्यासाठी सार्वजनिक किंवा घरगुती गणेशोत्सवांनी मंडळाचे व प्रमुखाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, फोन क्रमांक, गणेशोत्सव सार्वजनिक की घरगुती व विसर्जनाची तारीख असा तपशील मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या व्हॉटसअप किंवा इमेलवर पाठवावा. मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा व्हॉटसअप क्रमांक - ९२२६८०६९९८ व मंगलमूर्ती प्रतिष्ठान इमेल -mangalmurti808@gmail.com मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या या सभेला रत्नागिरीचे भूतपूर्व उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजन शेट्ये, श्री. सुधाकरराव सावंत, श्री. सुनील नलावडे, श्री. दिपक राऊत, श्री. सुरेश तथा अण्णा लिमये, श्री. नित्यानंद दळवी, श्री. उपेंद्र सुर्वे, श्री. अनिल नागवेकर, श्री. अविनाश तथा सरु सावंत, श्री. संदीप डोंगरे, श्री. राजारामराव सुर्वे, श्री. अशोक आंबवकर, श्री. प्रकाश शिंदे, श्री. रमाकांत पांचाळ, श्री. संजय वैशंपायन, श्री. अविनाश गवंडे, श्री. दिपक देसाई, श्री. निलेश लाड, श्री. विनायक चव्हाण, ज्येष्ठ उद्योजक श्री. विजयशेठ ओसवाल, श्री. राजेंद्र नेरकर, डॉ. दिलीप पाखरे, श्री. संतोष रेडीज, अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजन समिती अध्यक्षपदी राजन शेट्ये यांची निवड मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या रवि. दि. २ ऑगस्ट रोजी झालेल्या या सभेत रत्नागिरीचे भूतपूर्व नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजन शेट्ये यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांचे अभिनंदन केले. तसेच या सभेत विविध परीक्षक मंडळे व स्पर्धेसाठी विविध समित्या एकमताने स्थापन करण्यात आल्या. यावेळच्या स्पर्धा दरवर्षीच्या इतमामाला साजेशा पद्धतीने उत्साहात संपन्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg