loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ. स्वप्ना यादव यांना सहकार क्षेत्रातील विशेष पुरस्कार जाहीर

चिपळूण, (ओंकार रेळेकर) - सहकार क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन ’राजर्षी छत्रपती शाहू महाराज सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार स्वप्ना प्रशांत यादव यांना जाहीर करण्यात आला आहे. हा विशेष पुरस्कार असून स्वप्ना यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांची समतावादी संघटना असलेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिलच्यावतीने गेल्या ५ वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना ’राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना जाहीर झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा पुरस्कार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे दुपारी ४:०० वाजता माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे अभिनेते संजय खापरे, एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौशिक, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुमित, डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. सम्राट माने, अभिनेते हर्षद शिंदे, डॉ.आशीर्वाद लोखंडे तसेच अनिल कलकुटकी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती इंडियन स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

यावेळी प्रा. माधुरी राऊत, डॉ. माधवी महाके, डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा.डॉ.रजनी महेशकर, प्रा.डॉ. संयोगिता सासणे, डॉ. अनिता पाटील, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, कॅप्टन मोहन गुजरकर, अश्विनी दीक्षित, सोनिया इथापे, डॉ. कल्पना शिंदे, अंजली कुंदर्गी, प्रा. रूपेश भालेकर प्रा. दिपाली कु-हाडे, मीना राजेंद्र साळुंके, श्रुती कांबळे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg