loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापारी वर्गाची बैठक संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने आज नगरपरिषद सभागृह येथे शहरातील व्यापारी वर्गासाठी एकल वापर प्लास्टिक बंदी व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ संदर्भात मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी या विषयाचे सविस्तर सादरीकरण व मार्गदर्शन माहिती, शिक्षण व संवाद (IEC) तज्ञ शिवराज जाधव यांनी केले. यावेळी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांच्या नियमावलीनुसार प्रतिबंधित प्लास्टिकचे साठवणूक, विक्री व वितरण पूर्णपणे बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील बाजारपेठेतून प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक हटवून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाची जबाबदारी याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून प्रथम उल्लंघन ₹५,०००, द्वितीय उल्लंघन ₹१०,००० व तृतीय उल्लंघन ₹२५,००० दंडाची तरतूद असल्याची माहिती देण्यात आली. तसेच लागू कायदे व नियमांनुसार पुढील कडक कारवाईच्या तरतुदींबाबतही उपस्थितांना अवगत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी वापरण्यास परवानगी असलेले प्लास्टिक व निर्बंध असलेले प्लास्टिक याबाबत व्यापाऱ्यांना स्पष्ट माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून प्लास्टिकमुक्त व स्वच्छ रत्नागिरी घडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनासोबत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस रत्नागिरी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आरोग्य सभापती राकेश नागवेकर, सर्व समितीचे सभापती व नगरसेवक तथा नगरसेविका, आणि मुख्याधिकारी वैभव गारवे, उपमुख्याधिकारी मयूर बेहेरे, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg