loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवाजीराव सांवत सह. संस्थेतर्फे नायब तहसिलदार गोसावींचा सत्कार

केळंबे, लांजा (वार्ताहर) - स्व.स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सांवत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेच्यावतीने लांजाचे निवासी नायब तहसिलदार अनिल गोसावी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सन २०२५-२६ या महसुली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांवर उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लांजा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसिलदार अनिल संपतगिरी गोसावी यांचा रायगड येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर स्व.स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सांवत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष विवेक सांवत सदस्य चंद्रकांत शिंदे व अन्य पदाधिकारी यांनी निवासी नायब तहसिलदार यांची भेट घेऊन शाल, सन्मान चिन्ह व वटवृक्ष झाडाचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल गोसावी यांचे काम हे गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम आहे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विवेक सांवत यांनी सांगून समाधान व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg