रत्नागिरी (जमीर खलफे) : रत्नागिरी जिल्ह्याभरात ठिकठिकाणी अतिशय गंजलेल्या व धोकादायक झालेल्या विद्युत खांबांचे तात्काळ ऑडिट करून ते बदलण्यात यावेत, तसेच वीज पुरवठा खंडित असतानाही ग्राहकांच्या हातात पडणाऱ्या तफावतयुक्त आणि वाढीव बिलांबाबत तातडीने सुधारणा करण्यात यावी, या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना एक निवेदन देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यात आणि इतर वेळीही गंजलेल्या विद्युत खांबांमुळे मोठ्या अपघाताची टांगती तलवार नागरिकांवर असते. यामुळे अनेक भागांत जीवित आणि वित्तहानीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, महावितरणच्या प्रशासनाने स्वतःच्या यंत्रणेमार्फत संपूर्ण जिल्ह्याचा कसून सर्व्हे करावा, विद्युत यंत्रणेचे सर्व्हे ऑडिट करावे आणि जीर्ण व गंजलेले सर्व खांब तातडीने बदलून नवे खांब उभारावेत, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यासोबतच, वीज ग्राहकांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे वीज पुरवठा वारंवार बंद असतानाही वीज बिलांमध्ये मात्र कोणतीही घट न दिसता प्रचंड तफावत आढळते. नागरिकांना न वापरलेल्या विजेचे किंवा अवास्तव वाढीव बिल भरावे लागत असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकाराचीही महावितरणने गांभीर्याने दखल घेऊन वीज बिलांमधील तफावत दूर करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टीच्या या निवेदनाची आणि मागण्यांची महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी तातडीने दखल घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांना या प्रकरणी तात्काळ सूचित करून योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिक्षक अभियंत्यांनी दिले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी विधानसभा प्रभारी किशोर पवार, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, ॲड. प्रविण कांबळे तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार हे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर बहुजन समाज पार्टी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


























1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.