रत्नागिरी - स्वातंत्र्यदिना निमित्ताने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य तिरंगा बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली साळवी स्टॉप - जयस्तंभ - साळवी स्टॉप या मार्गावर होणार आहे. या रॅलीचा मुख्य उद्देश प्लास्टिकमुक्त रत्नागिरी या जनजागृती अभियानाला चालना देणे हा आहे. या निमित्ताने सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करण्यात येते की, प्लास्टिकमुक्त अभियान या विषयावर जनजागृती करणारे बॅनर, फलक किंवा संदेश तयार करून रॅलीमध्ये सहभागी होताना सोबत आणावेत.
ही रॅली केवळ तिरंग्याचा उत्सव नसून, स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त रत्नागिरीचा संकल्प करण्यासाठीची एक सामूहिक चळवळ आहे. चला, तिरंग्याच्या सन्मानासोबत रत्नागिरीला प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करूया! रॅलीदरम्यान वाहतुकीचे सर्व नियम व शिस्त पाळण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या देशभक्तीपर आणि सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमात जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष लायन सुमित ओसवाल व त्यांची संपूर्ण टीम तसेच रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


























1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.