loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त क्षयरोगमुक्त व नशामुक्त भारत अभियान संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त क्षयरोगमुक्त भारत अभियान व नशामुक्त भारत अभियान याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. इयत्ता दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध, उपचार तसेच व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यवान जोशी (सीनियर लॅब सुपरवायझर, कळंबणी, खेड), महेश वादक (सीनियर टीबी ट्रीटमेंट सुपरवायझर) तसेच विलास मस्के (कौन्सिलर, ICTC, कळंबणी हॉस्पिटल, खेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत क्षयरोगाचे वेळेवर निदान, योग्य उपचार, पोषणाचे महत्त्व आणि क्षयरोगापासून बचाव याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. “निरोगी युवक – सक्षम भारत” तसेच “नशामुक्त भारत” या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड यांना क्षयरोग निर्मूलनासाठी केलेल्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल व क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खेड, पंचायत समिती खेड यांच्याकडून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शाळेच्या सामाजिक बांधिलकीचे व सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी निवाते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. रोटरी स्कूलचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी सदर अभियानास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg