loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचे मार्गदर्शन

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून कार्य करण्याचे आवाहन करत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचे भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे सहसचिव कुणाल लोंढे, पनवेल तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष प्रमोद नाईक, उपाध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव विजय खुटले, खजिनदार निलेश गायकर, माजी अध्यक्ष मिलिंद पोपेटा, तसेच मीनाक्षी पाटील (कुंडेवहाळ), सुगंधा पारधी (सांगुर्ली), एकनाथ पाटील (पळस्पे), वसंत पाटील (वडवली), भरत पाटील (कुडावे) आणि दिलीप खुटले (चिंचवण) यांच्यासह परिसरातील अनेक पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीत पोलीस व पोलीस पाटील यांच्यातील समन्वय अधिक बळकट करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg