loader
Breaking News
Breaking News
Foto

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला रंगांची सुंदर साथ देत विविध आकर्षक व आशयपूर्ण रांगोळ्या साकारल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशप्रेमाची भावना कलाकृतींतून व्यक्त करत विद्यार्थ्यांनी तिरंगा, भारतमाता, स्वातंत्र्यसैनिक, देशभक्तीपर संदेश तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या विविध रांगोळ्या साकारल्या. सुबक रचना, आकर्षक रंगसंगती आणि आशयपूर्ण मांडणीमुळे शाळेचा परिसर रंगीबेरंगी तसेच देशभक्तीमय झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व यांची जाणीव अधिक दृढ झाली.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून जवळपास २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलाकृतींतून ‘देश प्रथम’ हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित केला आहे. यामधील उत्कृष्ट रांगोळ्यांची निवड करून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. असे उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg