loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे दत्त मंदिर येथे स्वामी सुत महाराज पादुका दर्शन सोहळा

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - चिपळूण तालुक्यातील दत्तमंदिर, सावर्डे येथे श्री स्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामीसुत महाराज यांच्या पादुकांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी डेरवण व सावर्डे गावातील महिला आरत्या घेऊन स्वागतासाठी वेशीवर उपस्थित होत्या. निळकंठ काशिनाथ शेंबेकर यांना प्रत्यक्ष स्वामींनी दिलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी यावेळी भक्तांना लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मठाचे सेवेकरी अविनाश शेंबेकर यांनी महाराजांचे वंशज विजय नलावडे यांचा विशेष सत्कार केला.श्री. व सौ. सुजाता सदानंद काटदरे आणि श्री. व सौ. ओवी ओंकार शेंबेकर यांनी पादुका पूजन केले. जमलेल्या ब्रह्म वृद्धांचा व वहाळकर बुवांचे वंशज सुजित वहाळकर यांचा विजय नलावडे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच महाराज्यांच्या वंशज मुली अमिता ताई, ज्योत्स्ना ताई व प्रकाश दादांच्या पत्नी प्रीती ताई यांचा ही स्वागत सत्कार केला गेला.

टाईम्स स्पेशल

चेंबूर येथे श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती विजय नलावडे यांनी 160 वर्षांपूर्वीचा मठाचा इतिहास जमलेल्या भक्तगणांसमोर मांडला. लाडू, खिचडी, इडली प्रसाद वाटपाने कार्यक्रम संपन्न झाला. संजय मेस्त्री व त्यांचे भजनी मंडळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची भजनाने शोभा वाढवली. सदर कार्यक्रमाचे उत्तम निवेदन व इतर सर्व व्यवस्था अमेय काटदरे व अविनाश शेंबेकर यांनी पार पाडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg