loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती अनुराधा नारकर यांची कुडाळ अंगणवाडी धान्य गोदामाला सरप्राईज व्हिजिट

देवगड /कुडाळ (प्रतिनिधी) - महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्यसाठ्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी केली. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा वेळेत आणि सुरळीतपणे मिळावा, यासाठी धान्यसाठवणुकीच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान गोदामातील बंदिस्त धान्याच्या पाकिटांची उघडून दर्जाची तपासणी करण्यात आली. तसेच धान्याचा साठा, त्याची मांडणी, स्वच्छता, संबंधित रजिस्टर तसेच नोंदींचीही पाहणी करण्यात आली. गोदामामध्ये धान्याची साठवणूक व्यवस्थित व सुयोग्य पद्धतीने करण्यात आली असल्याचे यावेळी आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा वेळेत आणि सुरळीतपणे मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने गोदामातून धान्याचा पुरवठा नियोजित वेळेत सर्व अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना सभापती अनुराधा नारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच धान्याच्या साठवणुकीबाबत स्वच्छता, नोंदींचे नियमित अद्ययावतीकरण आणि पुरवठा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. अंगणवाडी केंद्रांमधून बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यामध्ये पोषण आहाराला विशेष महत्त्व आहे. बालकांना योग्य प्रमाणात आणि वेळेत पोषण आहार उपलब्ध झाल्यास त्यांच्या आरोग्य व विकासाला मदत होते. त्यामुळे धान्यसाठा आणि त्याचा नियमित पुरवठा याबाबत प्रशासनाने अधिक काटेकोर राहणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

अशा प्रकारच्या नियमित तपासण्या आणि प्रत्यक्ष पाहणीमुळे धान्याच्या गुणवत्तेवर, साठवणुकीवर आणि वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, अंगणवाडीतील बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळण्यास हातभार लागणार आहे. या पाहणीवेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) प्रतीक उगारे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अंगणवाडीतील बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत व योग्य पद्धतीने मिळावा, यासाठी अशा प्रकारच्या नियमित तपासण्या व प्रत्यक्ष पाहणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg