सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले येथील महाविद्यालयांमध्ये लवकरच 'अप्रेंटिस ओरिएंटल पदवी' म्हणजेच शिकाऊ उमेदवारीवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी केली. संस्थेचे विश्वस्त लखमराजे भोसले, प्राचार्य दिलीप भारमल प्रा. गणेश मर्गज उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याचा आणि व्यावसायिक कौशल्यांचा अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच प्रत्यक्ष ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमांनुसार दरमहा विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड देखील दिले जाणार आहे मुंबई आणि ठाणे येथील महाविद्यालयात हा प्रयोग यापूर्वी सुरू झाला आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले सारख्या भागात हे कोर्सेस सुरू होत असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागणार नाही. हा अभ्यासक्रम व्यावसायिक गरजा आणि उद्योग जगताची सांगड घालून डिझाईन करण्यात आला असून, यामुळे शिक्षण संपताच विद्यार्थ्यांना थेट नोकरी मिळवणे सोपे होईल.
पर्यटन मत्स्य औद्योगिक क्षेत्रात काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत पदवी अभ्यासक्रमाच्या सहा सेमिस्टर मध्ये शेवटच्या वर्षी सहा महिने विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या ठिकाणी जाऊन काम करायचे आहे प्रत्यक्ष उद्योगाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळणार आहे त्यातून त्यांना रोजगार आणि नोकरी प्राप्त होईल भौगोलिक परिस्थितीनुसार महाविद्यालयांना अभ्यासक्रमात स्वायत्तता देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.


















































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.