loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. शाळा काळबादेवीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रत्नागिरी : सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, काळबादेवी या शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनन्या अनुष्का अमित मयेकर हिने, तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश देवयानी दिनेश बिर्जे हिने गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना वैशाली भास्कर झोरे तसेच पदवीधर शिक्षक महेश अर्जुन आरेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मान. भुवड, यांची प्रेरणा आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणामुळे हे यश प्राप्त झाले आहे.

टाईम्स स्पेशल

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गटशिक्षणाधिकारी डुबल, विस्तारअधिकारी आखाडे, केंद्रप्रमुख घाटगे, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक तसेच ग्रामस्थांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे व शाळेचे मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg