loader
Breaking News
Breaking News
Foto

'रिपाइ' च्या खेड तालुका अध्यक्षपदी बाबाराम पवार

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील घोगरे गावचे सुपुत्र सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेत सक्रिय असलेले बाबाराम पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेतृत्व, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी, संपूर्ण तालुक्यातील दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि राजकीय अनुभव या कार्याची दखल घेऊन बाबाराम पवार यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, बाबाराम पवार यांची खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करणे आणि समाजातील वंचित, दुर्बल व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, कोकणं प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम तांबे, पर्यावरण जिल्हाध्यक्ष अँड. सुरेंद्र तांबे, गणेश शिर्के, मिलिंद तांबे, विकास धुत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg