loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबणीत महामार्गाच्या मध्यभागी विद्युत पोल; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कळंबणी परिसरात महामार्गाच्या मध्यभागी विद्युत वाहिनीसाठी पोल उभारण्यात आला आहे. महामार्गाच्या दुभाजकातच विद्युत पोल उभारण्यात आल्याने या कामाला NHAI व संबंधित प्राधिकरणाची परवानगी आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.महामार्गाच्या मध्यभागी विद्युत पोल असल्याने वाहनाची धडक झाल्यास गंभीर दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कामाची तातडीने तांत्रिक पाहणी करून परवानग्या व सुरक्षा नियमांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महामार्गाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला विद्युत पोल तातडीने काढून विद्युत वाहिनी सुरक्षित आणि नियमानुसार ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg