loader
Breaking News
Breaking News
Foto

प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे सीपीएचसी प्रशिक्षण संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा येथे संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ, डॉ.सुधीर धनगे, डॉ.जुवेरिया मुजावरवैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र आचरा, आरोग्य सहाय्यक संजय नाईक, आरोग्य सहाय्यक. नित्यानंद भगत, गटप्रवर्तक चारुशीला गावकर, भावना राठोड, तसेच इतर सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) स्तरावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या CPHC अंतर्गत 13 प्रकारच्या सर्वसमावेशक आरोग्य सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान वरील सेवांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णांची तपासणी, आवश्यक उपकरणांचा वापर तसेच विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शनासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली. प्रशिक्षणास समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी, आशा आरोग्य कर्मचारी, परिचारिका व इतर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg