loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत भव्य तिरंगा रॅली उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वैभववाडी शहरात भव्यदिव्य अशी रॅली काढत विविध राष्ट्रभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयी अभिमानाची भावना निर्माण व्हावी, तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शासकीय कर्मचार्‍यांच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालय ते दत्तमंदिर परिसरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रॅलीत वैभववाडी तालुक्यातील सर्व आस्थापनांमधील कर्मचारी, पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी तसेच वैभववाडी शहर परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अभियानात तहसिलदार सूर्यकांत पाटील, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पलांडे, माजी वित्त बांधकाम सभापती संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, गटविकास अधिकारी वाघ, पोलीस कर्मचारी, अधिकारी, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माधवराव पवार विद्यालयचे मुख्याध्यापक कदम विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

तिरंगा ध्वज हा देशाच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा प्रतीक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकविण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg