loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडून महिने उलटले मात्र सेवा पुरवठादारांचा खर्च निधी अद्याप अदा नाही

रत्नागिरी : लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र राबलेल्या शेकडो हात आणि विविध सेवा पुरवठादारांवर आता आर्थिक संकटाची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडल्या. मात्र, या निवडणुकांसाठी झालेला करोडो रुपयांचा खर्च अद्याप अदा करण्यात आलेला नाही. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडूनच आवश्यक निधी प्राप्त न झाल्यामुळे प्रशासनाला ही देयके अदा करता आलेली नाहीत. निवडणूक पार पडून महिने उलटले तरी हक्काचे पैसे न मिळाल्याने ठेकेदार, व्यावसायिक आणि मजूर अत्यंत अडचणीत सापडले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक प्रक्रियेसाठी विविध कामांचा एकूण अंदाजित खर्च २४ कोटी १३ लाख २ हजार ८४८ रुपये (२४,१३,०२,८४८) इतका झाला आहे. यामध्ये सीसीटीव्ही व्यवस्थेसाठी १ कोटी ८२ लाख ७ हजार ७४३ रुपये, अल्पोपहार व जेवण व्यवस्थेसाठी ३ कोटी ८२ लाख ७५ हजार ५०० रुपये, तर मंडप व्यवस्थेसाठी सर्वाधिक ४ कोटी ३२ लाख ६६ हजार ५७९ रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय फोटोग्राफी व व्हीडिओग्राफीसाठी २ कोटी ८६ लाख ६० हजार ८९५ रुपये, संगणक भाड्याने घेण्यासाठी १ कोटी ६६ लाख ६३ हजार रुपये, आणि स्टेशनरी व प्रिंटिंग व्यवस्थेसाठी ४ कोटी ९७ लाख ३६ हजार ५० रुपये खर्च नोंदवला गेला आहे.

टाईम्स स्पेशल

इतकेच नव्हे तर हमाल व्यवस्थेचे १ कोटी ९५ लाख ७५ हजार रुपये, आरटीओ मार्फत खाजगी वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेचे १ कोटी ५७ लाख २१ हजार रुपये, आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) ६५ लाख रुपये थकले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील इंधन देयकाचे १ लाख ९७ हजार ८१ रुपये आणि तहसील कार्यालयाकडील विविध अतीतातडीचे ४५ लाख रुपये देणे बाकी आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी या सर्व घटकांनी वेळेत सेवा पुरवली, मात्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निधी न आल्याने देयके अडकून पडली आहेत. त्यामुळे स्वतःच्या खिशातून व कर्जाऊ पैसे उभारून काम करणार्‍या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामविकास विभागाने तात्काळ निधी वर्ग करून देयके अदा करावीत, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg