रत्नागिरी (जमीर खलफे) - मिर्या-नागपूर महामार्गावर मंगळवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणे नऊच्या सुमारास खेडशी येथील आकाशवाणी केंद्राच्या समोर एका ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला जोरदार धडक बसली. धडकेनंतर वासरू रस्त्यावरच कोसळल्याने काही काळ घटनास्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमी मुक्या जीवाला वेळीच उपचार मिळाले. ट्रॅव्हल्सची धडक बसताच वासरू रस्त्यावर पडले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. जखमी वासराची अवस्था पाहता त्याच्यावर उपचार कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला. नागरिकांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले.
दरम्यान, या अपघाताची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पालवे यांना मिळताच त्यांनी तत्काळ दखल घेऊन हातखंबा बीट अंमलदार भिसे आणि खेडशी बीट अंमलदार कदम यांना घटनास्थळी दाखल होण्यास सांगितले. विशेष म्हणजे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनु घोगरे यांना माहिती मिळताच त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता घरातून थेट घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले आणि जखमी बैलाची तपासणी करून आवश्यक इंजेक्शन व उपचार केले. त्यामुळे मुक्या जीवाला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली. अपघात, वाहतूक आणि मानवी धावपळीच्या वातावरणात अनेकदा मुक्या जीवांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र, या घटनेत स्थानिक नागरिकांनी दाखविलेली संवेदनशीलता, पोलिसांनी घेतलेली तातडीची दखल आणि डॉ. घोगरे यांनी वेळ न दवडता घटनास्थळी पोहोचून केलेले उपचार, यामुळे माणुसकीचा वेगळाच प्रत्यय आला आहे.
मुक्या जीवाला शब्दांत वेदना व्यक्त करता येत नाहीत; मात्र त्याच्या वेदना ओळखून मदतीला धावून जाणे, हीच खरी माणुसकी. अपघातानंतर उपस्थित नागरिक, पोलिस कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे जखमी बैलाला उपचार मिळाले. त्याचा जीव वाचविण्यासाठी झालेल्या या सामूहिक प्रयत्नाचे कौतुक होत आहे. ‘गरजेच्या क्षणी मदतीला धावून येणे’ या साध्या कृतीतूनच माणुसकीचे मोठेपण अधोरेखित होते. या घटनेतही तेच दिसून आले. मुक्या जीवाला वेळीच उपचार मिळाले, यातच उपस्थित सर्वांनीच समाधान मानले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.