loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटेत कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा

खेड : पटवर्धन-लोटे परिसरात कल्याण मटका जुगाराचे आकडे घेऊन जुगार खेळविणाऱ्या संशयित सचिन सुरेश चव्हाण याच्यावर खेड पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला सायंकाळी पावणे सातच्या सुमारास रुक्मिणी निवास इमारतीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. चव्हाण हा दैनिकातील कल्याण मटकाच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळवत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. कारवाईत मटका पावती पुस्तक, बॉलपेन आणि ९७० रुपये रोख, असा एकूण १ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg