loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदी निबंध लेखन स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालयाचे यश

बुरंबी-शिवने (संगमेश्वर) - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच श्रीमती अंधक्षती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरूख यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरशालेय तालुकास्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी-शिवनेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता ५ वी ते ७ वी गटात श्रेया रसिका यशवंत धाडवे हिने तृतीय क्रमांक, तर इयत्ता ८ वी ते १० वी गटात अधिका तुलसी नंदादीप दोरकडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. यशासाठी हिंदी विषय प्रमुख सुहास गेल्ये व स्वरूपा भोसले यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हिंदी निबंध लेखनातील या यशामुळे दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस शरद बाईत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप नारायण देसाई, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश भानुदास वीरकर तसेच, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg