loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फी झाडे वाढल्याने अपघाताची शक्यता

संगलट (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील अतिमहत्त्वाचा रस्ता म्हणून संगलट-कोरेगाव रस्त्यावर दोन्ही बाजूने झाडी वाढली आहे. यामुळे या रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात होत असल्याने वाहनधारकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरेगाव -संगलट रस्ता हा दापोली, मंडणगड, गुहागर आदी तालुक्याला जोडतो. त्यामुळे ह्या रस्त्यावर सतत वरदळ असते. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावर दुतर्फी झाडी वाढल्याने रस्ता पूर्णपणे दिसून येत नसल्याने रस्ता शोधण्याची वेळ वाहनधारकावर येऊन ठेपली असल्याचे बोलले जात आहे. सदरच्या रस्त्यावरून लहान रिक्षा टेम्पोच्या माध्यमातून संगलट, फोफलवणे आदी परिसरातून शाळेचे लहान-मोठे विद्यार्थी खेडकडे शिक्षणासाठी ये-जा करीत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र या रस्त्यावरून भर पावसाळ्यात विनापरवाना जांभ्या चिर्‍याच्या गाड्या तसेच वाळूच्या गाड्या इथून वाहतूक होत असल्याने लहान वाहनाला व विद्यार्थ्याच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. सदरच्या अवजड वाहनांमुळे लहान मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादा वाहनांमधून प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या, प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. याबाबत संबंधित बांधकाम विभाग झाडी तोडण्याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. एखादा भीषण अपघात झाल्यास त्या अपघाताला बांधकाम विभाग जबाबदार राहणार का? असे नागरिकांतून बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

सदरच्या ठिकाणी योग्य रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोरेगाव-संगलट रस्त्यावर दोन मोठी वळणे असल्याने खालून वर चढताना वाहनेच सोडा तर रस्ता दिसत नसल्याने वळणानंतर अचानक वाहन समोर येते त्यामुळे अपघाताचा धोका आहेे त्यामुळे सदरचे बांधकाम खाते एखादा अपघात झाल्यावर जागा होणार का? असेही थेट नागरिकातून बोलले जात आहे. या रस्त्यावरील दोन्ही बाजूवरील योग्य झाडे तोडण्याची कारवाई झाली नाही तर बांधकाम खात्यावर धडक मोर्चा काढण्याच्या विचार जनता करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg