दापोली : दापोली तालुक्यातील भिवबंदर—आघारी परिसरात प्रस्तावित २,८०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि जेएसडब्लू एनर्जी यांच्यात सामंजस्य करार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४४ हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून रोजगारनिर्मितीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दापोली दौर्यात पत्रकारांनी शिवसेना नेते कदम यांना प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला असता, या विषयाबाबत मला अधिकृत माहिती नाही, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पाच्या पर्यावरणीय बाबींविषयीही त्यांनी अधिक भाष्य टाळल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ काही मूलभूत प्रश्न उपस्थित करीत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार सिद्धेश रामदास कदम हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मग भिवबंदर—आघारीसारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका नेमकी काय आहे? स्थानिक नागरिकांच्या पर्यावरण, जमीन, रोजगार आणि पुनर्वसनाशी संबंधित प्रश्नांकडे संबंधित यंत्रणांचे पुरेसे लक्ष आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी संघाकडून करण्यात येत आहे. तसेच महसूल विभागाशी संबंधित जमीन व्यवहारांबाबत रामदासभाई कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील, तर त्या तक्रारींचे स्वरूप, संबंधित प्रकरणे आणि प्रशासनाने केलेली कारवाई याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करावी. केवळ तक्रारींचा उल्लेख करून विषय संपविण्याऐवजी प्रत्यक्ष चौकशी आणि पारदर्शक कारवाई झाली आहे का, हे जनतेला कळणे आवश्यक आहे. सध्या अधिकृत माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आणि योगेश कदम हे महसूल राज्यमंत्री आहेत.
त्यामुळे संघाचे सवाल स्पष्ट आहेत १. भिवबंदर—आघारी प्रकल्पाबाबत पर्यावरणीय परिणामांचा अधिकृत अभ्यास कोण करणार? २. स्थानिक नागरिकांच्या हरकती आणि मागण्यांची नोंद कशी घेतली जाणार? ३. स्थानिक युवकांना प्रस्तावित रोजगारामध्ये किती आणि कोणत्या पद्धतीने प्राधान्य दिले जाणार? ४. जमीन खरेदी-विक्री आणि महसूल नोंदींबाबत तक्रारी असल्यास त्यांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी होणार रका? ५. महसूल विभागाच्या अधिकार्यांवर किंवा कथित एजंटांवर काही आरोप असतील तर त्याबाबत अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत का? ६. पर्यावरणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्पष्ट भूमिका काय आहे?.. युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे म्हणणे आहे की, कोकणातील कोणताही मोठा प्रकल्प असोविकासाच्या नावाखाली स्थानिक जनता, जमीन, पर्यावरण आणि रोजगाराचे प्रश्न दुर्लक्षित होता कामा नयेत. रामदासभाई कदम यांनी या संपूर्ण विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि संबंधित महसूल व पर्यावरण यंत्रणांनीही अधिकृत माहिती जनतेसमोर मांडावी. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांना राजकीय वक्तव्यांनी नव्हे, तर कागदोपत्री माहिती आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे उत्तरे मिळाली पाहिजेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.