loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात रोखण्याच्या मागणीला राज्य शासनाकडून प्रतिसाद, युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनाची शासनस्तरावर दखल घेतली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर खेडेकर यांनी तातडीने हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी प्रकाशव्यवस्था करावी, धोकादायक ठिकाणांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अपघातांची कारणे शोधून ती दूर करावीत आणि प्रवाशांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी ठोस मागणी त्यांनी निवेदनातून केली होती. यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १३व्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण, अपघातप्रवण ठिकाणांवरील उपाययोजना, ब्लॅक स्पॉट्सचे विश्लेषण आणि अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने वैद्यकीय उपचार देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न घेऊन बाळा खेडेकर यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांमध्ये रस्त्यावरील सुरक्षाव्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्य रस्ता सुरक्षा परिषदेत रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण, अपघातप्रवण ठिकाणांचे शास्त्रीय विश्लेषण आणि आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजना करण्यावर शासनाने भर दिल्याने आपल्या निवेदनातील प्रश्नांना शासनाच्या पातळीवर महत्त्व मिळाल्याचे समाधान युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाने व्यक्त केले आहे. आम्ही केवळ निवेदन देऊन थांबणार नाही. मुंबई-गोवा महामार्गावर एकही जीव निष्काळजीपणामुळे जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. आमच्या निवेदनाची शासनाने दखल घेऊन रस्ता सुरक्षेच्या विषयाला महत्त्व दिल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी महामार्गावर दिसली पाहिजे, असे बाळा खेडेकर यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक ठिकाणी प्रकाशव्यवस्था, ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने उपाययोजना, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने कायम ठेवली आहे. निवेदनाची दखल घेतली, हा नागरिकांच्या आवाजाचा विजय आहे; आता अपघात रोखण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना झाल्या पाहिजेत, अशी भूमिका युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री महोदय आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्ता सुरक्षेच्या प्रश्नाला दिलेल्या प्राधान्याबद्दल युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg