loader
Breaking News
Breaking News
Foto

शिंगरी गावात घराच्या चॅनेलला नायलॉन दोरी बांधून ३५ वर्षीय तरुणाची गळफासाने आत्महत्या

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील शिंगरी गावातील बौद्ध वाडीतील ३५ वर्षीय तरुण महेश दगडुशेठ पवार याने आपल्या घराच्या पत्र्याच्या चॅनलला नायलॉन दोरीच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सोमवार दिनांक २१ सष्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी १७.०० वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक २२ सष्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजताच्या मुदतीत घडली असून, मयत महेश दगडु पवार याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्यावर त्याला उपचारार्थ कळबणी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकिय तपासणीस तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु रजिस्टर नंबर ८२/२०२६ बीएनएसएस १९४ नुसार नोंद करून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg