loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात सोनाराला चांदीचे ताट विकायला आलेल्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात, त्यापूर्वी महिलेची बचावासाठी धावपळ

रत्नागिरी - रत्नागिरी शहरात चांदीचे ताट विकण्यासाठी आलेल्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील एका सोनाराच्या दुकानात ही महिला चांदीचे ताट विकण्यासाठी आली होती. मात्र, ताटाच्या बाबतीत सोनाराला संशय आल्याने त्याने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांना माहिती मिळाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने हातातील चांदीचे ताट तेथेच टाकून दुकानातून पळ काढला. यानंतर पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. पोलीस कॉन्स्टेबल भाऊ पाटील बागुल यांनी तत्परता दाखवत पर्‍याची आळी परिसरात या महिलेला पकडून ताब्यात घेतले.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणातील चांदीचे ताट चोरीचे आहे किंवा कसे? याचा तपास पोलीस निरीक्षक विवेक पाटील करीत आहेत. महिलेने हे ताट कुठून आणले, चोरीच्या घटनेशी तिचा नेमका संबंध काय आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सोनाराच्या सतर्कतेमुळे चोरीच्या मालाची विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg