loader
Breaking News
Breaking News
Foto

चालकाने प्रवाशाची विसरलेली मौल्यवान वस्तूची बॅग केली परत; सर्वत्र कौतुक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - आजच्या कलियुगात जिथे माणूस पैशाच्या मागे धावत असताना प्रामाणिक पणा दुर्मिळ होत चालला आहे. तिथेच मोतिलाल कोळी या बस चालकाने स्व:ताचा प्रामाणिकपणा दाखवून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. प्रवासात विसरलेली प्रवाशाची तब्बल सात लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग प्रवाशाला सुरक्षितपणे परत करून चालकाने सर्वांची मने जिंकली असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त लांजा आगारातून विविध मार्गांवर जादा एसटी बसफेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. याचदरम्यान मुळचे कुवे येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले सुधीर नारायण बंडबे हे सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता लांजा येथून कल्याणकडे जाणार्‍या एसटी बसने प्रवास करीत होते. प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सुमारे सात लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग बसमध्येच राहिली आहे. या घटनेची माहिती बंडबे यांनी त्यांच्या कुवे येथील नातेवाईकांना दिली. त्यांनतर त्या नातेवाईकांनी मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास लांजा आगाराचे वाहतूक निरीक्षक ललित आयरे यांना माहिती दिली. आयरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने संबंधित बसचा शोध घेत चालक मोतीलाल नवल कोळी यांच्याशी संपर्क साधला.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, बसमध्ये बॅग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चालक कोळी यांनी ती सुरक्षितपणे ताब्यात घेतली. त्यानंतर बंडबे यांच्याशी दागिन्यांची ओळख पटवून घेत सर्व मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. विशेषतः या प्रवासातील जादा एसटी बस जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारातील असून कोळी हे चोपडा आगारात कार्यरत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही लाखो रुपयांचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल बंडबे कुटुंबीयांनी चालक मोतीलाल कोळी यांचे आभार मानले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे व कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg