loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडलोस येथे गळफास घेऊन आत्महत्या

बांदा (प्रतिनिधी) - पाडलोस-बामणवाडी येथे ६९ वर्षीय व्यक्तीने घराच्या पाठीमागील स्वयंपाकघरातील लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (२१ सप्टेंबर) दुपारी घडली. लक्ष्मण अमृत गावडे (वय ६९, रा. पाडलोस-बामणवाडी, ता. सावंतवाडी) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गावडे हे मानसिक आजाराने त्रस्त होते. सोमवारी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराच्या पाठीमागील स्वयंपाकघरातील लाकडी वाशाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आवश्यक कार्यवाही केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथे नेण्यात आला. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची बांदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg