loader
Breaking News
Breaking News
Foto

मडूरेत रेल्वेखाली वृद्धेची आत्महत्या

मडूरा - देऊळवाडी येथील रुक्मिणी विठ्ठल गावडे (७५) या वृद्ध महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मडूरा रेल्वे स्टेशन नजीक तीने आपली जीवनयात्रा संपविली. याबाबतची खबर मुलगा लक्ष्मण गावडे याने बांदा पोलिसात दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुक्मिणी गावडे या सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत घरात होत्या. तीचे मुलगा लक्ष्मण बरोबर बोलणेही झाले होते. ती सर्वांसोबत झोपी गेली. मात्र, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पाहिले असता ती आढळून आली नाही. तीची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती निदर्शनास आली नाही.

टाईम्स स्पेशल

थोड्याच वेळात रेल्वे ट्रॅकवर वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याची बातमी आली. त्यांनी खात्री केली असता तो मृतदेह रुक्मिणी हिचा असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या समवेत पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील नितीन नाईक यांनी सहकार्य केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg