loader
Breaking News
Breaking News
Foto

एसआयआरबाबत दोन निवडणुक आयुक्तांनी १० महिन्यात १४ वेळा तक्रार नोंदविली, आयोगात एकमताचा अभाव

नवी दिल्ली - भारतीय निवडणुक आयोगाने जून २०२५ मध्ये बिहार राज्यात विशेष मतदाता संशोधन अभियान अंतर्गत मतदार यादी तपासणी प्रक्रिया सुरु केली. एसआयआर अंतर्गत ३० राज्यात आणि केंद्रशाशित प्रदेशामध्ये मतदार यादीत १३ कोटीपेक्षा अधिक नावे हटविण्यात आली आहेत. एसआयआर बाबत निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. हे कोण निश्चित करीत आहे की, कोण मत देईल आणि कोण देणार नाही. माध्यमांनी मात्र याबाबत सखोल मोहीम राबवून निवडणुक आयोगाच्या अंतर्गत महत्वपूर्ण माहिती मिळवली आहे. निवडणुक आयोगाचे तीन सदस्य असून त्यामध्ये मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणुक आयुक्त सुखबिरसिंह संधू तसेच विवेक जोशी सहभागी आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणुक आयोगाच्या अंतर्गत दोन निवडणुक आयोगांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये संधू आणि जोशी या निवडणूक आयुक्तांनी महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. एसआयआरचे काम संपूर्ण देशात लागू करण्यासाठी या तिन्ही निवडणुक आयुक्तांचे मार्गदर्शन आहे. मात्र संधू आणि जोशी यांनी गेल्या १० महिन्यात कमीत कमी १४ वेळा अधिकाराने नकारात्मक भूमिका घेतली. एका दिवसात ४ वेळा घेतलेल्या निर्णयाला आणि आदेशाला या दोघांनी विरोध केल्याचे समोर येत आहे. निवडणुक आयुक्तांनी विरोध करताना नव्या मतदारांची नोंदणी, मतदार यादीतून नाव हटविणे आणि जोडणे, एसआरआय प्रक्रियेमध्ये मतदाराचे नाव जोडण्याकामी आदेशाच्या विरोधात अपील करणे आणि संपूर्ण मतदार यादीची सुरक्षा याबाबत महत्वाचे मुद्दे आहेत.

टाईम्स स्पेशल

जोशी आणि संधू यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून कामाच्या विभागणीबाबत तक्रार केली होती. दोन्ही निवडणुक आयुक्तांनी मतदार यादीसंदर्भात माहितीशिवाय घेतलेला निर्णय म्हटले आहे, आणि त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणुक आयुक्त आणि दोन्ही निवडणुक आयुक्त यांच्यात बैठक पार पडली. ही बैठक ४ महिन्यांनंतर होती. देशात लोकशाही पद्धतीने निवडणुक प्रक्रिया पार पाडताना, निवडणुक आयोगाच्या अंतर्गत एकता दिसून आली नाही, असे माध्यमांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg